राया , कवा येताय फडाला?
राया , कवा येताय फडाला?
आता लई थंडीचा कडाका वाढला
सांगा राया कवा येताय फडाला? //धृ//
कंच हिरवा शालू मी नेसले
रुप ऐन्यात सुंदर गं पाहिले
रंगीत सुगंधी गजरा हो माळला
सांगा राया कवा येताय फडाला?
गर्द कपूरी पानाचा विडा गं बांधला
निमचिकणी सुपारी गुलकंदही भरला
लवंग हळू टोचूनी बसविली तयाला
सांगा राया कवा येताय फडाला?
राया गोड गाण्यात तुम्ही घायाळ
रोखूनी पाहता लईच मधाळ
वाट पाहूनी शीण तनामनाला
सांगा राया कवा येताय फडाला

