STORYMIRROR

Tejas sawant

Romance

3  

Tejas sawant

Romance

पावसातील ती

पावसातील ती

1 min
342

मुसळधार पावसात त्या 

आमची जोडी जमली होती

मी पाहिलं होत मला भिजताना

पाहून ती मनातच हसली होती


बसस्टॉप आमचा भेटायचा

कट्टा बनला होता

ऑफिस वरून येताना तोच

आमचा सोबती बनला होता


थंडगार पावसात मस्तपैकी

टपरीवर गरम चहा व्हायचा

'चहा एकाच कपात देऊ का'

टपरीवाला हसत विचारायचा


घरी जायची शेवटची बस 

आम्ही मुद्दाम सोडायचो

पावसात दोन छत्र्या असूनही  

एकाच छत्रीतून घरी चालत जायचो


ती वीज चमकल्यावर घाबरायची 

आणि मला घट्ट मिठी मारायची

मलाही भिती वाटणारी वीज

सारखी चमकावी अस वाटायची


ती माझ्या खांद्यावर डोक ठेवून

मनमुराद गप्पा मारायची

सोबत आपली सात जन्मांची आहे

माझा हातात हात घेऊन सांगायची


त्या सात जन्मांच्या वचनावर क्रूर

नियतिने आघात केला होता 

जेव्हा माझ्या डोळ्यासमोर 

तिचा अपघात झाला होता


पावसातील ती मला सोडून 

कायमची निघून गेली

प्रेमी मनाला माझ्या दु:खाच्या

घोर अंधारात लोटून गेली


तो बसस्टॉप आज सुना झालाय

तो चहा आपली आठवण काढतोय

तू परतून एकदा येना तो वेडा 

पाऊस अजून आपली वाट पाहतोय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance