STORYMIRROR

Tejas sawant

Romance

4  

Tejas sawant

Romance

तुझा ही होकार असेल का..?

तुझा ही होकार असेल का..?

1 min
236

पाहताच तुझ्या प्रेमात पडणारा मी

पण तुलाही माझ्यात रस असेल का

प्रेमाची वाट एकत्र चालायची म्हंटले

तर तुझा ही "होकार" असेल का...?


असेन मी जर काळोखी आभाळ

तर तू चांदणं होवून 'सजशिल' का

अंधारात कधी भरकटलो मी तर

पणती होवून माझ्यासाठी 'जळशिल' का...?


असेन मी जर मोकाट पतंग

तर तू त्याला सांभाळणारा धागा होशील का

इच्छा असेल पतंगाची उडण्याची तर

बंधन त्या धाग्याचे सुटेल का...?


असेन मी जर सुगंधाला भुळणारा सारंग

तर तू त्याला भुळवणारी कस्तुरी होशील का

वारा होवून स्वार झालो फुलांवरती

मोगरा होवूनी दरवळ फक्त तुझाच असेल का...?


असेन मी प्रेमाचे अपूर्ण चित्र

तर तू रंगवून ते पूर्ण करशील का

शेवट होईल या प्रेमाचा जेव्हा आपल्या

त्या क्षणीही तू माझ्या सोबत असशील का...?


असेन मी जर तुला लिहिणारा कवी

तर तू लगेच मिळणारी कविता होशील का

जाहलो आपण एक निबंध प्रेमाचा

तर त्यातले अक्षर सुवाच्च असेल का...?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance