STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

पावसाचा लडिवाळा

पावसाचा लडिवाळा

1 min
268

पाऊस तिला नेहमीच हवा असतो

म्हणून तिला पाहिल्याशिवाय 

तो येतं नसतो

मग पाऊस आल्यावर 

ती सैरभैर होते

चिंबचिंब भिजताना सरींना कवेत घेते


पाऊस आलानाही तर ती रूसून बसते

अभाळाकडे पाहून

येरे येरे पावसा म्हणते 

तिला रूसलेलं पाहून

पाऊस हळूवार येतो

तिने आडोसा घेतल्यावर

तिला खिडकीतून

डोकावून बघतो


वारा तिची छेड काढताना

पाऊस खवळून जातो

विजांचा कडकडाट करून

तिला दुर पळवतो

मग ती दारात उभी राहुन

पावसाचा लडिवाळा बघत असते

थकूनभागून गेल्यावर 

पावसाचा निरोप घेते


तिचे अस सोडून जाणे

पावसाला नको वाटते

तिची सोबत नसल्यावर

त्याला गहिवरून येते

पाऊस नाराज होवून शांत होतो

तिचे ओसरीत उभे रहाणे आभाळातून बघतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance