तू
तू
तुझ्या साध्या दिसण्याला
भाळलो होतो सखे
तुझ्या निरागस हसण्याला
फसलो होतो सखे
हळूवार तुझ्या बोलण्यात
गुरफटलो कळले नाही
तुझ्या शिवाय कधीच
मागे वळलो नाही
साधेपणा भावला मला
शिकलो साधे जगणे
माणुसकीला सांभाळत
साधेपणाने वागणे
तूच होतीस वाट दाखवत
अंधारात मलाही
कितीदा सावरलेस प्रत्येक
अडथळ्यात तूही

