STORYMIRROR

Pramod Hamand

Tragedy

3  

Pramod Hamand

Tragedy

बाप माझा

बाप माझा

1 min
28.2K


बाप माझा नशीबाचं बीज

शेतामंधी पेरीत गेला

दाबुनी मुक्या वेदना

जगता-जगता मरत गेला


पीकवूनी पांढरं सोनं

लोखंडाच्या भावात विकत गेला

फेडता-फेडता सावकाराचे व्याज

जगता-जगता मरत गेला


निघणारा दिवस सारखाच

पावसाळे-उन्हाळे झेलीत गेला

नशीबाले दोष देऊनी

जगता-जगता मरत गेला


आज नाही तर उद्या मिळल सुख

याच आशेवर जगत गेला

कर्जाचा डोंगर घेऊनी उरावरी

जगता-जगता मरत गेला


दिवस-रात्र राबूनी देह थकला

शेवटचा श्वास इथे घेऊनी गेला

शांत झोपला सुखाने मातीत

जगता-जगता मरत गेला.


Rate this content
Log in

More marathi poem from Pramod Hamand

Similar marathi poem from Tragedy