'बेदर्द दिल्ली'
'बेदर्द दिल्ली'
एके दिवशी स्वप्नामध्ये
'निर्भया' आली ...
क्षणामध्ये सारी
कहाणी सांगून गेली ...
तिची कहाणी ऐकता ऐकता
मन माझं सुन्न झालं ...
स्रीवरील अन्यायाविषयी
सारं काही सांगून गेलं ...
कळवळून म्हणाली मला
जर लवकर मदत मिळाली असती मला ...
तर प्रतिकाराचे काही क्षण
अनुभवले असते मी ...
माझ्यावरील अन्यायाने
सक्षम केले मला ...
तरी पण लढण्यासाठी
जगायचे होते मला ...
क्षणभरातच माझी आसवे
तिने टिपली ...
अन् नकळतचं मनाला
लढण्याची प्रेरणा देऊन गेली ...
जाग आली तेव्हा कळलं
हे तर स्वप्न होतं सारं ...
सत्यामध्ये साकारण्यासाठी
मला झगडायचं आहे खरं ...
निर्भयाच्या धडपडीला
माझा मानाचा मुजरा ...
आता तरी स्त्रियांनो
अन्यायाचा प्रतिकार करा ...
अन् दाखवून द्या जगाला
स्त्री शक्तीचा दरारा ...