'प्रतिबिंब'
'प्रतिबिंब'
आरशात न्याहाळताना ...
आज स्वतःचेच 'प्रतिबिंब' खूप सुंदर भासले ...
दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणाऱ्या डोळ्यांचा अभिमान वाटला ...
नवल ते काय डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांचादेखील विसर पडला ...
दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणार ...
हास्यदेखील आज दुर्मिळ वाटलं ...
का कोण जाणे आज स्वतःचं 'प्रतिबिंब' न्याहाळताना ...
'खऱ्या सौंदर्याचं' मर्म कळलं ...
