'आई'
'आई'
तुझ्या मायेची सर
न कोणा येई ...
लेकरासाठी अविरत धडपडते
ती असते 'आई' ...
तव मायेचा स्पर्श होता
चिंता अवघ्या दूर होती ...
तुझ्या आशिर्वादाने
माझे आयुष्य उजळती ...
सगळ्यात कठीण असतं
ते 'आई' होणं ...
आणि त्याहून कठीण असतं
ते 'आईपणं' जपणं ...
देवाचे अस्तित्व
नाही जगत्रयी ...
म्हणून निर्माण केली
त्याने 'जन्मदात्री' ...
तव वर्णनाला मज
शब्द पडती अपुरे ...
तुजविण मम् 'जननी'
जागी काय उरे ...
