"आठवणी"
"आठवणी"
1 min
282
"आयुष्याची एकच पुंजी
सोबतीला आहे आठवणींची छोटीशी कुपी"
"कधी मज भूतकाळात नेते
बालपणीच्या सुखद क्षणांना पुन्हा जगवते"
"कधी मज शाळेत नेते
जुन्या बाकावरील बालपणीच्या सवंगड्यांना पुन्हा भेटवते"
"कधी मज महाविद्यालयात नेते
स्वप्नांच्या हिंदोळ्यांवर पुन्हा झुलवते"
"कधी हसवते, तर कधी रडवते
कधी वास्तवाचे चटके देते, तर कधी अलगद मायेचा ओलावा देते"
"आठवणींची हि अमूल्य ठेव
न जाणे कधी आयुष्याची शिदोरी बनते"