STORYMIRROR

PRIYA DESHPANDE

Fantasy

2  

PRIYA DESHPANDE

Fantasy

'अस्तित्व'

'अस्तित्व'

1 min
16.3K


जीवनाच्या वाटेवर चालता चालता

हरवले होते मी ...


न जाणे कुठल्या कोड्यांच्या पल्याड

गुंतले होते मी ...


वाट धूसर होती तरी

पावलं चालत होती ...


ध्येय असाध्य होतं तरी पावले

अडखळत नव्हती ...


प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याची

आस मनी होती ...


'अस्तित्वाच्या' ह्या लढाईमध्ये

कुठेतरी 'मी' गवसले होते ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy