"मी"..!
"मी"..!
"मी"..!
जन्मापासून शोधत आहे
आणखी मला मिळलेलंच नाही
मी नेमका कोण आहे
हेच मला समजलं नाही।
शाळेत बसतो
मन लावून काम करतो
बाहेरचा विचार डोक्यात आला की
त्याच्यातच गुंतून राहतो।
मैत्रीच्या दुनियेत
हवाहवासा म्हणून जगावसं वाटतं
कधी नकळत दुर्लक्षित झालो मित्रांकडून
तर दुःखाच आभाळ मनात येऊन दाटतं।
कधी मैत्री, कधी घरगुती काम
कधी राजकारण, तर कधी समाजाचं भान;
यामध्येच तर पुरता वाहून गेलोय,
कोणाच्या न कोणाच्या जिव्हाळ्याचा झालोय,
याच आनंदात न्हाऊन गेलोय।
दिवस सरतो , रात्र होते
उद्याची सकाळ
एक वेगळीच पर्वणी घेऊन येते।
सकाळ पासून रात्रीची
चालू आहे तारेवरची कसरत,
मी आपलं प्रामाणिकपणे जगतो;
पण तरी देखील काहीजण,
का करत असतील माझी नफरत।