STORYMIRROR

Shila Ambhure

Fantasy

1.0  

Shila Ambhure

Fantasy

निसर्ग सखा

निसर्ग सखा

1 min
31.9K


निसर्ग हा माझा सखा

निसर्ग माझा सोबती

जिथे जिथे जाईन मी

तिथे हा माझा सांगाती।।धृ।।


खट्याळ हा ओढा बघा

हुंदडतो रानीवनी

झुळझुळ वाहे कसा

मंजुळ हा गातो गाणी

त्याच्या गं साथीने बाई

वृक्षवेली बहरती।।१।।


सुंदर ही झाडे चानक

देती आम्हा फळेफूले

गार गर्द सावलीत

खेळण्यात दंग मुले

कष्टकरी ,थकलेले

घेती क्षणिक विश्रांती।।२।।


शेतमळे ,बागा आणि

डोंगर-दऱ्या,पठारे

जैव विविधता इथे

स्वच्छंदी वाहे वारे

इथेच हा अथांग सागर

पाऊसधारा झरती।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy