STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

लाचारी

लाचारी

1 min
28.8K


कधी कधी माणूस

होतो लाचार...

मजबुरीन किंवा

परिस्थितीनं....


रस्त्यावरचा भिकारी

पत्करतो लाचारी

करावे थोडे कष्ट

राहू नये अविचारी....


मिरविती टेंभा

लाचार आधिकारी

खुर्ची खालून गांधीजी{नोटा}

मनाचा भिकारी .....


साधी राहणी

असावे उच्च विचार

माणसाने कधीच

होऊ नये लाचार......


सांभाळेना मुलगा

वृद्ध हो लाचार

सुनबाई मुलाचा

मोठा विकार.....


प्राॅपर्टीसाठी होते

सून लाचार

फक्त पेन्शनपुरता सासूच्या

करत असते विचार.......


असतो पुढारी सदैव

मतांसाठी लाचार

निवडणुकीपुरती आश्वासने

नंतर जनता बेजार.....


असू नये कधी

जीवनात लाचार

जागवा स्वाभिमान

मनी थोर विचार.....


असावेत नेहमी

आदर्श आचार

चांगली शिकवण

खरा शिष्टाचार.....


लाचारी जिवनाची

खरंंच करा मूठमाती

स्वाभिमान राखून

कमवा माणुसकीची नाती.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy