STORYMIRROR

Trupti Naware

Tragedy

3  

Trupti Naware

Tragedy

तृषा

तृषा

1 min
27.2K


तृषातृप्त कराया कंठ

या जीवाची झाली तडफड..

थेंबही न गेला चोचीत नि

झाली पंखांची नुसती फडफड..

ओघळले पाणी प्रयत्नात

हाती लागले न काही कणभर..

मी टिपले लगेच त्याला शब्दांत

त्याला कळलेच नाही क्षणभर..

तरी तृप्तश्वासाची भरारी

त्याने घेतली गगनभर..

विनवतो परतुन मला विश्वासाने

"परत त्यात थोडं,पाणी भर..

परत त्यात थोडं पाणी भर.."


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy