STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

3  

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

दुःख धरतीचे

दुःख धरतीचे

1 min
28K


तापलेल्या धरतीने हाक मारली

ए पाऊसा जरा जाण आमचा जीव

आता तरी तुला येऊ दे आमची कीव्

कासाविस झाले सर्व पक्षी, प्राणी जीव


पोटा पाण्यासाठी सारे हिंडती रानोमाळ

लहान त्यांची पिले अन्नासाठी धावपळ

धाव सारे घेती पक्षी, प्राणी, भूमंडळ

तुझी आतुरतेने वाट पाहू लागली

तुझ्या भेटीसाठी सर्व एक झाली


सोडला रे धीर आता माझ्या लेकरानी

जगणेच नको म्हणे, ओरडून पाणी, पाणी

एवढा मोठा आक्रोश त्यांना सहन होईना

भुकेलेल्या पोटाकडे त्यांना बघवेना


जनावरे पाण्यासाठी हंबरत होती

उन्हाच्या तडाख्याने कासाविस होती

तापलेल्या धरतीची हाक पाऊसाने ऐकली

काळ्या ढगातून पाणी ओतु रे लागली

पाणी पोटभर पिऊन सर्व तृप्त हो झाले

धरतीची कृपा झाली जीव नतमस्तक झाले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy