माणसाच्या जाती
माणसाच्या जाती
निर्माण झाल्या जन्मापासून माणसाची नाती
माणसाचीच माणसाला का वाटते मग भीती ।।
माणसं माणसात मुर्खासारखी वागू लागली
माणसं कमरेचं सोडून तोंडावर ओढू लागली ।।
माणसांना माय, बहीण, मुलगी, नसे याचं भान
माणसाने शेण खावं की अन्न नसे याचं ज्ञान ।।
वासनेच्या भरात माणसे अत्याचार करू लागली
पिसाळलेल्या कुत्र्या गत लचके तोडू लागली ।।
मंदिरात होतो बलत्कार साक्षी देवाला ठेऊ लागले
देवाची काय भिती उघडया डोळयानी पाहू लागले ।।
कोठे गेला कृष्ण आता कोण येईल धाऊन
मंदिरातला देव सुद्धा घेतो डोळे लाऊन ।।