अस्त
अस्त
विरळले नाते, ओसाड पडल्या भिती
बोलायला नाही सवड, दुरावली नाती
आधुनिकतेच्या युगात पडला दुष्काळ
सख्ख नाते जाते येथे पडद्याआड
नवलाई माणसातील कुठेतरी संपली
सणवार फक्त आता नावालाच उरली
एकत्र कुटुंब, सुखी संकल्पना जीवनी
झाली एकाची दोन घरे, दुषित मनी
चूल आणि मूल शोभून दिसे घरास
सडा सारवण, नाही रांगोळी घरास
सुख दु:ख शेजाऱ्याचेही वाटून घ्यायाचे
आज अपार्टमेंटमध्ये घर बंद करून राहायचे
कशी ही अस्थिरता, भासते ही गंभीरता
हरवून माणसे, मिटत चालली अस्मिता
पुन्हा होईल तसेच वाटते हो मनी
नका तोडू नाते, जपा ती फक्त मनी
