STORYMIRROR

Alka Deshmukh

Tragedy

3  

Alka Deshmukh

Tragedy

रंग आयुष्याचा....

रंग आयुष्याचा....

1 min
26.5K


काळा अन पांढरा

दोनच रंग पाहिले

आयुष्यात आजवर 

मी कोरडीच राहिले

कपाळी तो रंग पांढरा

बालपणी उमटला

नजरेने रंगछटा चा

अर्थ नाही उमगला

हात भोंडवेच माझे

बिल्वराच्या काचेला

स्पर्श तो हिरव्या चुड्याचा

नजरेला का बोचला

सुखाचे हे सोहळे

आता कसे कधी खेळू?

समाजाची बंधने ही 

मीच कुठवर ही पाळू?

घरातला जेष्ठ बायांनी

आखली आयुष्याची रेखा

उंबऱ्यातच घातली मी

रांगोळीची सप्तरंगी लक्ष्मण रेषा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy