STORYMIRROR

Alka Deshmukh

Others

3  

Alka Deshmukh

Others

सांग हं नक्की

सांग हं नक्की

1 min
213

कधी आलीच आठवण 

तर सांग...

कधी आठवले तुला 

तर सांग जरूर....

तो हात मायेचा

 ममतेने पाठीवर फिरणारा...

सतत आपल्याच कामात गुंग 

राहूनही

दिवसदिवसभर काबाडकष्ट 

घरादारांचे उपसतांना

रामरगाडा संसाराचा

 मूक मौन ओढतांना

एकाच क्षणासाठी 

जवळ येऊन

तोंडावरून ...डोक्यावरून

 पाठीवरून फिरलेला ..

हात मायेचा ममतेचा.?

वेडी असते रे ती अशीच...

कधी तरी वेळ काढून करते ...चाळा

कधीतरी डोईला तेल लावून मालिश

ओतून देते सारीच ममता

बोटांच्या पेरातून 

त्या केसाकेसांच्या मुळावर

आणि सोबतीने....

अस्तित्व ही आपले

 हळूहळू पेरत जाते...

कधीतरी आठवले तुला तर सांग मोकळे पणानं ...

बोलून घे 

मनातलं गुज तुझ्या...

ऐकून घे 

काही गुज तिच्याही मनातलं

बोलकी होऊ दे

 ती सगळी माया...

ओघळून जाऊदे 

गालांवरून तुझ्या हृदयापर्यंत ....

अश्रूं तून घळघळून वाहू दे

मग मोकळ्या मनानं...

बघ जरा जुळतेय का 

कुठे तरी नाळेतल्या बंधाची

 ती ओढ...

आहे का कुठेतरी ओलावा...

झिरपणारा आतून 

त्याच झरझररून वाहणाऱ्या 

मायेच्या ममतेचा.....

मायच्या तीळतीळ तुटणार्या आतड्याची 

तीच भूक आहे का जागी 

बघ 

एक क्षणभर थाबून 

या अफाट जगातल्या फाफट पसाऱ्यात.....!!!!!


Rate this content
Log in