STORYMIRROR

Alka Deshmukh

Others

3  

Alka Deshmukh

Others

मराठी चारोळी

मराठी चारोळी

1 min
235


मागे वळून पाहतांना

वाट वळणावरून गेली

मन तुझे माझे सोबत

वाटे वरच ठेऊन गेली.......!!!


मागे वळून पाहतांना

आठवणींच्या रांगा सजल्या

रिमझिम नाचत पैंजणाच्या

गुंजन करत कानांत वाजल्या......!!!



मागे वळून पाहतांना

सावली तुझी हसणारी

पापणीतून दाटलेल्या

मेघा आडून पुसट दिसणारी.......!!!


सावलीत शोधतोय मी

आपल्या जुन्या पाऊल खुणा

हृदयातल्या स्मृतींच्या होत्या

 माळा जपलेल्या पुन्हा पुन्हा......!!!


तो चंद्र मी अन तु आज

अशी सजली वरात

प्रीतीच्या या अंगणी

चांदण्यांची झाली बरसात....!!!



तो चंद्र मी अन तु साथ

अशी सजली वरात

प्रीतीच्या या अंगणी

चांदण्यांची झाली बरसात....!!!



 

तो चंद्र मी अन तु होतास

माझ्या स्वप्नातल्या जगांत....

सगळ्या चांदण्या आल्या

 जणू नाचत गात पदरांत.....!!!



माझ्या मनाच्या आकाशात

तो चंद्र तु अन मी.. लाजणारी

प्रत्येक क्षणाला आपली

चांदरात स्वप्नात सजणारी.....!!!



स्वप्नाला किती रंग देऊ

डोळ्यातल्या पाण्यातून

व्यथा कशी मोकळी करू

गुणगुणल्या गाण्यातून.....!!!!



Rate this content
Log in