STORYMIRROR

Alka Deshmukh

Inspirational

3  

Alka Deshmukh

Inspirational

शौर्य पदक

शौर्य पदक

1 min
27.5K


पदकात चेहरा 'तो' ती आज शोधतांना

झाली उदास होती पाहुनी हो धन्याला


चेहरा भकास होता ना वाजणार कांकणे ही

ती हळुवार चालतांना आसमंत उदास होता


आधार तो घराचा सोडून आज गेला

देशास राखतांना तिज पोरके करून गेला


पाहून दुःख त्यांचे आभाळ ही रडावे

दिसणार न बाळ आता काहीतरी घडावे


तोंडात घास फिरतो त्या माय माऊलीचा

देशास रक्षितांना तान्हा शहिद तिचा


ही वेदना जिवाची डोळ्यात आज वाहे

ती चोहीकडे शोधणारी नजर बाळास पाहे


देशाभिमान हृदयी डोळ्यांत मान दाटे

देशार्थ प्राण वाहिले अभिमान सार्थ वाटे


झाले शहीद त्यांचा सत्कार आज आहे

सन्मान लेकरांचा मिळणार पदक आहे


घेतां हसून हाती सन्मान तो पतीचा

चेहरा फुलून गेला त्या सौभाग्यशालीनीचा......!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational