STORYMIRROR

Alka Deshmukh

Tragedy

3  

Alka Deshmukh

Tragedy

आईचा प्रेमदिवस

आईचा प्रेमदिवस

1 min
259

आज पुन्हा आईचा प्रेमदिवस आला

सगळीकडे प्रेमाचा त्या गलबला झाला...!!


एक दिवस फक्त होतो तिचा उदोकार

बारा महिने झेलते ती सगळ्यांचे वार

'आई' शब्द हा कौतूकाचा विषय झाला

आज पुन्हा आईचा प्रेम दिवस आला...!


तिची माया तिचे प्रेम तिची सारी तळमळ

लेकरांच्या सुखासाठी अश्रू झरती ढळढळ

पोटातच ठेवते वेदना ..सोसते ती कळा

आज पुन्हा आईचा प्रेमदिवस आला..!


संसाराचे वार झेलले जीव थकला भागला

वेदनांनी जखमी मनाचा कोंडमारा केला

तापल्या मनावर थंड शिडकावा ...झाला

आज पुन्हा आईचा प्रेमदिवस आला..!


आईच्या प्रेमाची खोली मोजता ना आली

आईच्या पदराची झोळी सर्वांसाठी खुली

अमृताचा पन्हा पाजून जीव तिने वाढवला

आज पुन्हा आईचा प्रेमदिवस आला


आज पुन्हा आईचा प्रेमदिवस आला

सगळीकडे तिच्या प्रेमाचा गलबला झाला....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy