सय(आठवण)
सय(आठवण)
सांजवेळ झाली तुझ्या
आठवांची सय दाटलेली
श्वासात त्या माझ्या श्वासांची
लय हळुवार गाठलेली
कधी आठवांच्या लडी त्या
हळुवार रेशीमगाठीसवे
लपेटून घेतो मनाच्या घडीला
तुझ्या पैंजणाच्या चाहुलगाठी सवे
नको दूर जाऊन वेल्हाळ पाहू
नको या जीवाची परीक्षाच पाहू
सखे जीवनावीण अता जगतांना
कसा सांग श्वास हा तुजविण घेवू
तुला पाहिले अन विसरलो मला मी
तुला पाहिले अन विसरलो जगा मी
किती आवरू या वेड्या या मनाला
कसा सांग सावरू धडकत्या हृदयाला
हातात हात घेवून फिरू चांदण्यात
शरदातल्या या शीतल चांदरातीला
मनातले गुज बोलुनी मोकळे सांगना
कानांत माझ्या तो चंद्र आहे साक्षीला
तुही सांग सखये मला दिलातले
मीही बोलतोच आज मनातले
स्वप्नातल्या त्या रेशीमगाठी
हळुवार अलगद सोडवू वाटले
अशी सांजवेळ ही आज आली
मनाची अशी दिवाळीच झाली
लक्षदीप आता उजळून आले
मनाच्या अश्वास उधळून गेले
किती आज बेफाम झालो सखे ग
तुझ्याच साठी मी आलो सखे ग
अशी मान वेळाऊनी पाहता तू
हज्जार जन्मास मी जगून गेलो सखे ग..!!!!

