STORYMIRROR

Alka Deshmukh

Classics Fantasy

2  

Alka Deshmukh

Classics Fantasy

निसर्ग नर्तन

निसर्ग नर्तन

1 min
3.1K



खरंच निसर्गाची

किमया न्यारीच

त्याच्या नाना कळा

त्याची बरसातही भारीच


उंच उंच पहाडांवर

चालणारे हे नर्तन

ढगांचे पुंजके उतरून

खाली करती मस्त मोकळं विचरण


मधेच होणारा

अमृताचा शिडकावा

पानोपानी नाचणाऱ्या

थेंबांचा शिरकावा


पानावरती नाचती

जलबिंदू टपोरे पावसाचे

होऊन मोती आणि

हिरे चमकती थेंबांचे


कडकडाट विजांचा

आणि वाजणारे ढोल

पाखरांचा चिवचिवाट

झाडांचे आनंदाचे बोल


निसर्गाच्या सोबत

रमताना माझ्या मनात

ढगांवर स्वार होऊन

घेऊ भरारी गगनात


आला आला करीत नर्तन

ऋतु हिरवा भिजवी तनमन

अशी मेखला घालीत धरेला

रेशीम रेशीम झाला आसमंत


नद्या मंजुळ कलकल करती

गालीचा हिरवा पसरलेल्या

मलमलीच्या पायघड्या

जागोजागी अंथरलेल्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics