STORYMIRROR

Alka Deshmukh

Others

4  

Alka Deshmukh

Others

तिच्या साठी.... आज....

तिच्या साठी.... आज....

1 min
516

नको मान-सन्मान

नकोत हे सत्कार

आदर असू द्या मनात

एवढा करा उपकार...


आई ताई बाई...

घरातही आहेत ना

दारातून बाहेर पडताना

संस्कार सोबत घेऊन या...


मान द्या आदर करा 

रोजच हे काम करा

एकच दिवसाचा दिखावा..?

लोकांसाठी सारा देखावा..?


मनातून असू द्या

मनातच वसू द्या

आपली ताई समजून

प्रियंकाही जगू द्या...


नका जाळू नका मारू

जिवंत यातनांनी तिची

रोजची होळी नका करू

एक दिवस का रोजच करा हे सुरु...


आईला आनंद होईल

ताईचे टेन्शन जाईल

छोटी पण बिनधास्त होईल

बाईचं जगणं सोपं होईल...


कोसणार नाही ती जन्माला

टोकणार नाही कुणी तिला

मुक्त मोकळ्या आभाळात

मिळेल मोकळा श्वास तिला....!!!


Rate this content
Log in