STORYMIRROR

Alka Deshmukh

Others

4  

Alka Deshmukh

Others

तिचा दिवस

तिचा दिवस

1 min
487

जागतिक महिला दिवस... हार्दिक शुभेच्छा....!!!


तिचं घर

तिचा थाट

तिचा शृंगार

तिचा राग

तिचं रूप

तिचाच विचार

तिचा हक्क

तिचं कर्तव्य

तिचं सुख 

तिचा अधिकार

तिची माया

तिचा त्रागा 

तिच्या हाका

तिची जागा

तिचं हृदय

तिचं जग

तिचं भाग्य

तिचं सौभाग्य

तिचं घर

तिचा संसार

तिचा मान

तिचा आत्मसन्मान

तिची वाट

तिचा थाट

तिचं अधर

तिचं उदर

तिचा गुरुर

तिचं शरीर

तिचा गर्भ

तिचं अर्भ

तिचे कर्म

तिचा हात 

जीवन घाट

कठीण वाट

तरी चालते

सगळं साहते

एक दिवस... फक्त

"तिचा" उदो उदो

एक दिवस तिला

शुभेच्छांचे हार

एकच दिवस तिचा

हारांसोबत सत्कार......


मग.......

रोजच तिची तक्रार

रोजच नजरांनी बलात्कार

शब्दांनी बलात्कार

करायचेच... करायचे बलात्कार...


मग........

जाळायचे तिलाच..!

मारायचे तिलाच...!

खटले कोर्ट आणि शिक्षा...

फाशीचाही व्यापार... 

सगळा तमाशा...

एकदा नाही हजारदा शब्दांनी बलात्कार आणि मेल्यानंतरही नाहीच न्याय...

न्यायातही बलात्कार....

नाहीच.... नाहीच न्याय......


सतत अन्यायाशी झुंजत असलेली 'ती'

अशा...... "तिचा"

आजचा एक दिवस "सन्मान"

आज तिला पुष्पहार

उद्यापासून

तिचाच उद्धार...


आज जागतिक महिला दिवस... साजरा होतोय "तिच्या" आठवणीत...?

निर्भया, प्रियंका आणि कितीकच लहानग्या कळ्या 

ज्यांचं ना वय पाहिलं ना जीवन मोजलं 

ना हसल्या त्या ना जगल्या त्या 

अजूनही थांबली नाही विटंबना त्यांची ती....

ती संपली...

अन्... तिला

न्याय नाहीच मिळाला...


रोज नवे कायदे आणि कायद्यांच्या नव्या पळवाटा

न्याय मिळाला की पावतील का हो "तिला" 

हे सगळे हार आणि सत्कार.....

हे सगळे सन्मान...

कुणाचा करताय हा सन्मान..?

एकदा तरी "तिला" मिळेल का न्याय..?

तोपर्यंत निरर्थक आहे निषेधार्ह आहे हा दिवस आणि हे शुभेच्छांचे हार 

या सगळ्याचं कौतुक... काय...?


Rate this content
Log in