STORYMIRROR

Alka Deshmukh

Tragedy

4  

Alka Deshmukh

Tragedy

ती रात्र

ती रात्र

1 min
431

ती रात्र वेगळी होती

संवाद मूक जाहले

स्पर्शात चांदणी ओली

श्वास हे बोलके झाले


झरझरणाऱ्या धारा

तुफान वाहतो वारा

मला जमलेच नाही

रोखून ठेवण्या गारा


झटकता केस ओले

निसटून क्षण गेले

ओघळले सारे गाली

शिंपल्यात मोती झाले


कांकणे वाजली हाती

किणकिण कानी आली

मोगरा सुगंधी झाला

आठवांची गर्दी झाली


प्राजक्त सुगंधी होता

फुले उधळती गंध

वाटेवर थांबलेला

प्रितीचा तो मधुगंध


धुंद सांज आठवली

त्या आपल्या सांज भेटी

वाटेवर राहिलेल्या

पाऊल खुणांची दाटी


आजही बकुळ माझा

हळवा मलूल होतो

पापणीत साठलेले

क्षण तो मजला देतो


जमले कधीच नाही

रोखून तिला पाहिले

डोळ्यांत जीव गुंतला

मन तिकडे राहिले


विसरून गेली तेव्हा

गुलाबी रेशीमझेला

आजही मनात माझ्या

तो जपून ठेवलेला


मागे वळून पाहता

साद मधुर ती आली

घुंगरू वाजले कानी

ही सांज कोवळी झाली


सांगू कुणा ही काहिली 

आतल्या मनात झाली

क्षण निसटून गेले

आज आठवण आली....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy