STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

3.1  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

आत्महत्या....

आत्महत्या....

1 min
30.7K


मरण इतके स्वस्त झाले

विसरून चालले जीवन

नको करू आत्महत्या

सोपे सहज झाले मरण


आईने दिला जन्म

आणि दाखविले जग

वाढविले स्वतः च्या पोटात

नऊ महिने 9 दिवस...सोसली रग


आईच्या त्या कष्टांची

जाणीव जीवनी ठेव

धरून हिंमत दांडगी वाग

जगी ठेवू नकोस भेव....


आत्महत्या नाही पर्याय

त्यावर एकच तरूणोपाय

ठेवल्यास अपेक्षांचे ओझे कमी

दिवस आनंदात जाय...


नको चिंता नको जमा करू धन

ठेवावी जागृत मती आणि शुध्द मन

लाख आली संकटे जरी

धैर्याने तू मानवा जग...


नको खचूस अपयशाने

आत्महत्या हा पर्याय नाही

अनमोल हे जीवन मानवाचे

मानवी जीवन पुन्हा नाही....


शरीर मेल्याने माणसांचे

स्वप्न मरत नाहीत

एकदा गेलेली माणसं

परत दिसत नाहीत...


अनमोल जीवन मानवाचे

अखेरच्या श्वासापर्यंत जगायचं

झेलत लाख संकटे

पुढं पुढं चालायचं....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy