STORYMIRROR

Gauri Ekbote

Tragedy

2.4  

Gauri Ekbote

Tragedy

इतक सोप असत का विसरून जाणं ।

इतक सोप असत का विसरून जाणं ।

1 min
28.2K


इतक सोप असत का विसरून जाणं ।

मनावर झालेल्या जखमांवर मलम लावणं ।।

भळभळणाऱ्या रक्ताने कायम

माखलेल्या असतात त्या

वरून जरी भरल्या असल्या

तरी खोल आत

कुठेतरी ओल्या असतात त्या ।।

एकावर एक वार होतचं असतात

जखम अजुन खोल करत असतात

पण ह्या वेदनेत पण चेहरा

मात्र आनंदी ठेवायचा असतो

कारण कुणीतरी त्यात खुश होत असतं ।।

काही झालाच नाही अशी मनाची

समजूत काढायची

एकांतात मात्र जखमेवर

अलगद फुंकर घालायची

ह्या जखमा म्हणजे अनुभव समजायचे

भावनांना आवर घालून हसत जगत राहायचे ।।

                                       


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy