क्षितीज ……
क्षितीज ……
क्षितीज म्हणजे अगम्य , अद्भुत आणि सुंदरता ह्यांचा मिलाप .
क्षितीज म्हणजे कधी डोकावणारा सुर्य , कधी धावत येणार काळे मेघ,
कधी उडणारा पक्षांचा थवा ,तर कधी जमिनीला टेकलेलं आभल.
क्षितीज म्हणजे एक उत्सुकता वाढवणारी आभाळ आणि जमिनीतली किनार.
काय असेल ह्या क्षितिजाच्या पलीकडे? कस असेल ते जग? खरच जमिनीला भेटत असेल का आभाळ?
कि हा डोळ्यांचा भास?
सूर्याची पहिली किरण सुधा क्षितिजा पलीकडून येतात, आणि मावळतीला सुधा ती क्षितीजातच विसावतात .
