STORYMIRROR

Gauri Ekbote

Children

3  

Gauri Ekbote

Children

चिऊचं पिल्लू

चिऊचं पिल्लू

1 min
221

इवलंसं चिऊ च घरटं 

त्यात इवलेसे तिचे पिल्लू 


इवल्या इवल्या पिल्लू चे इवले इवले आभाळ 

इवल्याश्या पंखांना उडण्याची घाईच फार 


इवलीशी ती धडपड पंखांची फडफड 

इवल्या इवल्या जीवाची उडण्याची तडफड 


आभाळात उडायचे उंच उंच लांब 

कधी ह्या झाडावर तर कधी त्या डोंगराच्या पार 

घटकेत खाली जमिनीवर तर घटकेत वर आकाशात 

पिल्लाची तर आहेत स्वप्न अशी महान 


इवलुश्या पिल्लूची इवलुशीच झेप 

ठाऊक आहे चिऊला , लवकरच भरारी घेईल हे थेट 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children