STORYMIRROR

Gauri Ekbote

Abstract

3  

Gauri Ekbote

Abstract

अचलकीला -अचला

अचलकीला -अचला

1 min
187


वसुंधरा ल्यायली आकाशी शाल

हिरवा भरजरी शालू अन सप्तरंगी इंद्रधनू ची माळ

 

क्षितीजाच्या भाळावर सूर्याचं गोंदण

रात्रीच्या आकाशाला चंद्राचं कोंदण

 

वाऱ्याच्या बांगड्यांची किणकिण ती फार

नदीच्या बटांमध्ये बदकांची रांग

 

दाट धुक्याची पावडर ,सुगंधी दवाचा शिडकाव

रात्रीच काजळ कमल नयनात

 

रंगीत रंगीत फुलपाखरा सम कर्णफुले ती छान

भाळावर रुळे इंद्रधनू ची कमान

 

प्राकृतिक तिचे सौंदर्य , अलौकिक ती धरा

अशी आहे माझी अचलकीला - अचला,रत्नगर्भा,वसुधा-वसुंधरा.

 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract