STORYMIRROR

Gauri Ekbote

Romance Tragedy

3  

Gauri Ekbote

Romance Tragedy

तुझ्या आठवणींची पोटली

तुझ्या आठवणींची पोटली

1 min
23

सांज वेळी आठव तुझी अथांग समुद्र भासे

आठवणींच्या लाटांनाही उगाच उधाण येतसे

नसतो दिवस नसते रात्र हि संधिप्रकाशाची वेळ

कातरवेळी हूर हूर मनी भास तुझे हे खेळी खेळ


तो पहा, तो सूर्य हि जातसे

चांदणीस भेटावया

सोडूनि सर्व किरणांचा पसारा

होऊनि चंद्र, चांदणं बरसावया


एकटाच मी ह्या किनाऱ्यावर तू पल्याड पोहोचली

सोबतीस आहे आता तुझ्या आठवणींची पोटली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance