STORYMIRROR

Gauri Ekbote

Romance

4  

Gauri Ekbote

Romance

“तेव्हापासून माझी मी न राहिले गं…”

“तेव्हापासून माझी मी न राहिले गं…”

1 min
3

मनात कितीतरी गोष्टी घेऊन ती त्याला भेटायला गेली होती. त्याच्याशी खूप काही बोलायचं होतं, मनातल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. पण प्रत्यक्षात तो समोर आल्यावर मात्र शब्दच हरवले.

त्याची नजर तिच्या नजरेला भिडली आणि क्षणभर सगळंच थांबल्यासारखं वाटलं. ओठांवर हसू होतं, मनात भावनांचं वादळ होतं… आणि त्या निःशब्द क्षणांतही दोघांमध्ये खूप काही घडून गेलं.

आता ती आपल्या मैत्रिणीसमोर बसली होती. भेट संपली होती, पण तिचं मन अजूनही त्याच क्षणात अडकलं होतं. त्याच्या नजरेत हरवलेली ती, मनात उमललेलं नवं काहीतरी जपत, आपल्या मैत्रिणीला सगळं सांगत होती…

आणि तिच्या तोंडून नकळत शब्द उमटले—


शब्द हरवले, डोळे बोलत राहिले गं

न सांगितलेलं  त्यांच्यापर्यंत  पोहोचविलं. ।।

आर्तता ही मनाची,मनालाच कळाली गं,

ओढ अनामिक एकमेका लागली गं ।।


क्षण तो थांबावा, असंच वाटत राहिलं गं,

त्यांच्या नजरेत माझं मन हे हरवल   ।।

ओठांवर हसू अन् मनात उठलं वादळ  गं  |

अबोल भावनांचा अंतरात हा  कल्लोळ ।।


काही न बोलता खूप काही घडलं गं, 

मनात नातं नवीन एक उमललं ।।

भेट संपली, मन त्या क्षणात हरवलं गं, 

तेव्हापासून माझी मी न राहिले गं… ।।

 

गौरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance