STORYMIRROR

Gauri Ekbote

Others

3  

Gauri Ekbote

Others

सांजवेळ

सांजवेळ

1 min
321


दूर क्षितिजा जवळ, डोंगर रांगांच्या कडेला,

जेव्हा सूर्य दिवसभरचा दमून भागून क्षणभर विसावा घेतो 

मावळतीचे स्वतःचेच रंग बघत काहीतरी आठवत डोंगर आड निघून जातो

ती वेळ म्हणजे सांजवेळ

 

 एक एक आठवण लाट बनून मनावर आदळते आणि

अश्या आठवणींना जेव्हा उधाण येत

ती वेळ म्हणजे कातरवेळ

 

लांब च्या प्रवासाला गेलेलं आपलं पिल्लू येणार आहे ,

ते अजून कस नाही आलं ,अशी हूर हूर लावून वाटे कडे

डोळे लावणाऱ्या आईची वेळ तिन्हीसांजेची वेळ

 

केव्हा एकदाच घरी पोहोचतोय आणि

आई च्या हातचा चहा पित तीला दिवस भरच घडलेल कधी एकदाच स

ांगतोय

अशी शेअरिंग ची वेळ म्हणजे इव्हनिंग ची वेळ

 

शाळा सुटल्यावर बरोबर जाऊ , तू गेटलाच थांब ,

ऑफिस सुटल्यावर कट्ट्यावर भेटू,

अश्या प्लॅनींगची वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ

 

अशी एक वेळ जेव्हा खूप उजेड हि नसतो आणि रात्री चा काळा अंधार हि नसतो

अश्या वेळेला जेव्हा दिवस आणि रात्र एकमेकांच्या मिठीत असतात,

 ती जोडणारी वेळ म्हणजे संधिप्रकाशाची वेळ

 

मावळतीचा सूर्य बघत , एकमेकांच्या हातात हात घालून

समुद्रकाठच्या वाळूत बसणं

म्हणजे संध्याकाळची “तिला” दिलेली वेळ

हूर हूर त्या दिवसाचा शेवट आणि रम्य रात्रीची चाहूल लावणारी वेळ सांजवेळ


Rate this content
Log in