Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gauri Ekbote

Abstract

3  

Gauri Ekbote

Abstract

आकाश

आकाश

1 min
180


दूर डोंगर क्षितिजाशी बसून निळाईला न्याहाळत हरवून जायला होत

हे आकाश मोठं चमत्कारिक हं , आणि तेवढंच fashionable.

म्हणजे बघ ना - सकाळ होताच गुलाबी रंगाची उधळण त्यात हि खूप वेग वेगळया सुंदर छटा

उगवतीला बघितलं तर लाल रंग आणि त्या नंतर इतरत्र फिकट गुलाबी त्या हि पुढे निळा आणि काळा असा मिश्रित रंग कि ज्याला थोडी गुलाबी किनार आणि त्यात पहाटेचा शांत गार वारा अहाहा .....

जसा जसा सूर्य वर येईल तस तस ती लाली आजून वाढत जाणार आणि दुपार पर्यंत पिवळ्या रंगाचे कपडे घालून केव्हा तयार होऊन येईल कोणाला कळणार देखील नाही

किती तरी रंग , रंगाच्या छटा हे आकाश पांघरून असत

कधी निळा , कधी लाल,तर कधी गुलाबी  

कधी काळा , कधी पिवळा तर कधी केशरी

रात्रीच्या आकाशाची तर सजण्याची मजा काही न्यारी

नुसतं काळया रंगाचे कपडे घालून नाही तयार होणार तर त्या गडद काळ्या कपड्यावर चांदण्याच जरी वर्क

आणि चंद्राचं कोंदण करून घेणार, रातराणीच्या अत्तराचा छोटासा फाय जवळ ठेवणार

आणि शांत स्तब्ध तलावात एक सारखं स्वःताच रूप न्याहळत बसणार ,

संध्याकाळी बगळ्यांच्या रांगेत गप्पा गोष्टी करणार  

तर घारी बरोबर उंच उंच जाण्याची शर्यत जमवणार

 एखादा भरकटलेला ढग आलाच मध्ये तर हवे च्या बरोबर त्याला त्याच्या घरी सोडणार

नदी बरोबर उद्या मारत अवखळत समुद्राला जाऊन भेटणार

डोंगराच्या पलीकडे जाणाऱ्या सूर्याला चिमण्या पाखरांन बरोबर बाय बाय करणार आणि त्याला स्वतःत सामावून घेणार आणि परत म्हणणार "उद्या भेटू रे ... "


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract