चल ना... परत एकदा
चल ना... परत एकदा
ए ऐक… ना... चल ना... चल भेटू एकदा नव्याने परत
थोडा वेळ विसरूयात सध्याचं जग
ठेवू बाजूला थोडावेळ तीच - तीच रोजची कामं
आज भेटू परत एकदा त्याच आपल्या बाकावर
किती वेळ गप्पा चालायच्या न आपल्या
सगळं जग विसरून, आपलंच फक्त एक वेळ जग होतं….
“हो... हो माहिती आहे…” आता ते जग सत्यात उतरलंय
आणि त्यात आपली दोन मुलं पण आहेत,
पण तरीही आज चल ना परत त्या पाऊल वाटेवर
थोडा वेळ तसेच हातात हात घेऊन चालू आणि परत तेच विषय घेऊन बोलुयात
नवीन बदल सगळे सोडून परत तेच जुनं आयुष्य थोडावेळ जगुयात
विसरूयात आपल्या जबाबदाऱ्या, काळज्या, चिंता थोडा वेळा करता
आणि घेऊ चोरून थोडे क्षण परत एकदा
ए ऐक ना... चल ना... चल परत एकदा