STORYMIRROR

kishor zote

Tragedy

3  

kishor zote

Tragedy

गारपीट ( हायकू )

गारपीट ( हायकू )

1 min
27.1K


अशी कशी हो

अवकाळी सुसाट

ती गारपीट

आंबा बहर

सडा जमिनीवर

कच्च्या कैऱ्यांचा

ते उभे पिक

आडवे ते झोपले

स्वप्न भंगले

ते पंचनामे

होतील सरकारी

गळी ती दोरी

अश्रु डोळ्यांत 

चितेच्या या आगीत

त्याच शेतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy