STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Tragedy

3  

गोविंद ठोंबरे

Tragedy

विरह..

विरह..

1 min
29.8K


एकदा वाट काढून ये पिंजलेल्या त्या आठवनींवर

गहिवरल्या वळणावरती अन गुंफलेल्या नात्यांवर

एकदा मन बनवून ये दिलेल्या त्या शब्दांवर

भाजलेल्या वेदनांवर अन हरवलेल्या जागेवर

एकदा फक्त सजून ये भिजलेल्या त्या जखमांवर

विस्कटलेल्या क्षणावर अन मळकटलेल्या पाऊलखुणांवर

एकदा अजून न्हाऊण ये टिपलेल्या त्या प्रतिबिंबावर

तू दाखवलेल्या स्वपनांवर अन विरघळलेल्या बंधनांवर

एकदा परत धावून ये रुणझुणत्या पैंजणांवर

धगधगत्या विरहगंधावर अन लखलखत्या चांद रातींवर

एकदा श्वास रोखून ये थरथरत्या त्या ओठांवर

नजरेच्या थीर चलपटावर अन आसवांच्या डोहावर

एकदा सर्व सोडून ये वचनांच्या सांज तीरावर

तू साद दिलेल्या हाकेवर अन माझ्या ओंजळीतल्या आशेवर

तू हसून लाजून परत ये घायाळ केलेल्या अदांवर

हट्ट अट्टहासाच्या शिंपल्यावर अन तू रुतलेल्या काळजावर

तू वेळेला थांबवून परत ये धडधडत्या स्पंदन गजरावर

मायेच्या सैल पदरावर अन चाहुल लागलेल्या सावलींवर

तू शेवटची अखेर बेभान ये स्मशान झालेल्या मातीवर

मी तांडव केलेल्या अग्निवर अन थकून निजलेल्या वाटेवर....थकून निजलेल्या वाटेवर .....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy