हुंदका
हुंदका
लेकीचे लग्न छान करून दिले
परत माझ्या कामात व्यस्त झाले.....
नातू झाला गोरागोमटा छान छान
राजस्थानला सासरी तिला मिळे मान....
बैल घाण्याला जुंपतात तसे झाले
सासरला कामात दिन जावू लागले...
होता होता सहा वरीस पार पडले
कुटुंबात त्यांच्या वाद सुरु जाहले...
सासरी तिचा अपमान होवू लागला
जीव तिचा कशातच नाही रमला....
सासरी सार्यांनी नको नको केले
घर सोडण्याचे विचार मनी आले.....
एक दिवस असा बाई तिचा आला
मुलाला तिथे ठेवून माहेरी पळ काढला...
सिनेमाची कथा शोभावी असे घडले
क्षणातच सारे होत्याचे नव्हते झाले....
आली माहेराला लेक बाबाच्या लाडाची
आई आजी आजोबांच्या माया ममतेची....
हुंदका दाटला तिला पाहताच क्षणी
काय होणार लेकराचे विचार आला मनी....
मायेने जवळ घेतले पाठीवर हात फिरवला
मायेची जादूची झप्पीत तिचा जीव विसावला....
