सावली
सावली


अल्लड ती
अवखळ ती
शांत ती
उत्साही ती
बावरी ती
हिरमुसणारी ती
खळखळून हसणारी ती
स्वतःवर चिडणारी ती
चिडवणारी ती
समजून घेणारी ती
समजूत घालणारी ती
रंगात रंगणारी ती
ती फक्त तीच
ती राधा
ती मीरा
ती रूक्मिणी
ती पार्वती न्
ती फक्त आणि फक्त माझीच
ती म्हणजे ....
दुसरं तिसरं कुणी नसून
ती माझी सावली