पुरूष
पुरूष
कधी रागावतो कधी ओरडतो...
पुरूष असाच असतो ,
पण सर्वांवरचा प्रेमरूपी अश्रू
एकांतात,अलगद त्याच्या डोळ्यातून झिरपतो !
हवं,नको ते आणून द्यायला...
रात्रंदिन एकटाच कष्टतो
समोर ठाकलेल्या कठीण परिस्थितीशी
झगडत दोन हात करतो !
बायकोला दागदागिने करायला ,
आईला तीर्थक्षेत्री पाठवायला
ओव्हरटाईम सुद्धा करतो !
एवढं थकून भागून घरी आल्यावर
मुलांबरोबर लहानही तोच होऊन जातो !
कोण म्हणत भावना नसतात त्याला ?
तो दाखवत नाही फक्त
मुलीसाठी आई पेक्षा काळीज त्याचं जळतं जरा जास्त !
असते कधी कधी पैशांची अडचण..
पण कुटुंबाला नाही फिरू देत वणवण !
कधी सांभाळतो नातेवाईकांची भुणभुण
चेहर्यावर तरी सुद्धा नसते कसली आठी अन खूण
विचार करत राहतो तो झोपेत बदलताना कुशी...
घ्यावी का या पाडव्याला बायकोला ठुशी ?
स्वतःच्या मनासारखं जगता येत नसताना...
कुठलीच तक्रार करत नाही वेळ निसटून जाताना ,
लक्षच जात नाही त्याचं रक्तदाबाच्या नियंत्रणावर
अशाच सर्व ओझ्यातून दमलेल्या मन नी शरीरावर
नकळत कायमचं निरोप घेतं या जगातून त्याचं पार्थिव
आठवणी छळतात कुटुंबाला फक्त नंतर
त्याच्या कमवून..कमवून जमवलेल्या एकेक पैशातून !
या सर्वांमध्ये त्याच्या इच्छा, आकांक्षा गेलेल्या असतात विरून..
पण आता त्या आधारस्तंभाचा दिवा गेलेला असतो विझून
का मनसोक्त न जगता जायचं असं आयुष्य झिजवून..झिजवून ?
संपता त्याचं अस्तित्व लोचट लांडगे लागतात लचके तोडू
संरक्षक भिंतींच्या विटा लागतात फोडू
तेव्हा कळतं कुटुंबाचं छत असतो पुरूष !
अख्ख्या घरपरिवाराचा डोक्यावरचा हात असतो पुरूष !
