STORYMIRROR

AMOL UMBARKAR

Romance Tragedy

3  

AMOL UMBARKAR

Romance Tragedy

आता सवय झाली आहे

आता सवय झाली आहे

1 min
303

नवरा असून घरात

कपाळ मोकळं ठेवायची

आता सवय झाली आहे


पुत्र असून पोटी

वांझ म्हणून मिरवायची आता सवय झाली आहे


पदर आहे साडीला

पण आता त्या तिरक्या नजरांची सवय झाली आहे


तो असतो सोबत माझ्या

पण त्याच्या शिवाय जगण्याची आता सवय झाली आहे


बोलण्याची इच्छा खूप आहे

मात्र आसवांनी बोलण्याची आता सवय झाली आहे


माणसं आहेत माझीच सगळी

पण आता परकेपणाची सवय झाली आहे


समाजात सन्मान मिळवावासा वाटतो

मात्र आता पावलोपावली अपमानाची सवय झाली आहे


प्रेमात पडावंसं वाटतं मलाही

पण आता एकटं राहण्याची सवय झाली आहे


फूल होऊन भ्रमराला पिसे (वेड) लावावेसे वाटते

पण जन्माआधी मरण्याची सवय झाली आहे


मुक्या भावनांचा बांध फोडावासा वाटतो

पण आता कविता लिहिण्याची सवय झाली आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance