STORYMIRROR

AMOL UMBARKAR

Romance Tragedy Fantasy

3  

AMOL UMBARKAR

Romance Tragedy Fantasy

तुझी धडपड मी पाहिली होती

तुझी धडपड मी पाहिली होती

1 min
232

उन्हात ही साथ न सोडणारी, तू माझी सावली होती

मला पाहण्यासाठीची तुझी धडपड मी पाहिली होती...


काल चांदण्या मोजताना

तुझ्या रूपाचा शुक्र तारा पाहिला होता 

भेट व्हावी तुझी नी माझी यासाठी जीव आसुसला होता

तुझ्या कमलनयनातून कोसळणारी आसवाची धार मी पाहिली होती

मला मिळवण्यासाठीची तुझी धडपड मी पाहिली होती...


आणा-भाका जरी घेतल्या होत्या आपण दोघांनी

नाते पवित्र आपले, मात्र वाईट अर्थ काढला लोकांनी

त्या लोकांच्या विरोधात वाहिलेली एक एक लाखोली मी ऐकली होती 

न सांगता प्रेमाची कबुली देण्याची तुझी धडपड मी पाहिली होती...


वाटते तोडावे सारे बंध आणि येऊन बिलगावे तुला

पण तुझ्या कपाळीचे कुंकू, तू माझी नाहीस हेच सांगते मला..

लग्नानंतर ही मला पाहून, काही काळ तुझी पाऊले स्तब्ध झाली होती

बहुतेक हीच माझ्या अबोल प्रेमाची खरी पावती होती

उगाच पैंजणाचा आवाज करून मला तुझ्याकडे ओढण्याची तुझी धडपड मी पाहिली होती...


दीप प्रेमाचा लावून, तू वातीसम जळून गेलीस

होतीस काल माझी तू, आज मात्र परकी झालीस

बऱ्याच गोष्टी तुला ही सांगायच्या होत्या

ती इच्छा तुझी अपूर्ण राहिली होती

ती इच्छा पूर्ण करण्याची तुझी धडपड मी पाहिली होती...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance