STORYMIRROR

AMOL UMBARKAR

Tragedy Others

4  

AMOL UMBARKAR

Tragedy Others

मी माणसं ओळखायला चुकलोय...

मी माणसं ओळखायला चुकलोय...

1 min
343

नको त्यांना मी माझं मानत आलोय

बहुतेक मी माणसं ओळखायला चुकलोय...


स्वार्थासाठी सर्व संधीसाधू बनतात

संकटात मात्र आपल्याला वाऱ्यावर सोडून जातात

माणसंच ती शेवटी, आपली औकात दाखवतात

या बनावटी लोकांमध्ये मी पुरता अडकलोय

बहुतेक मी माणसं ओळखायला चुकलोय...


काल कोणीतरी येऊन दंगल पेटवून गेली म्हणतात

मी मात्र आजही माझ्याच अस्तित्वाशी लढतोय

ज्यांना आपलं मानलं होतं

त्यांना जीवाच्या आकांताने शोधतोय

बहुतेक मी माणसं ओळखायला चुकलोय...


ज्या माणसांना जवळ घ्यावं

त्यांनीच पाठीत खंजीर खुपसावं

ही रीत आता रोजचीच झाली आहे

कोणालातरी आपलं मानून जगण्याची सवय झाली आहे

शोधतो मी माझा मलाही, तरीही कोणी परकाच गवसतोय

बहुतेक मी माणसं ओळखायला चुकलोय...


रोज नवी माणसं भेटतात त्यांनाही, आपलं म्हणायची भीती वाटते

आशा संपली जीवनाची कधीच, आता नित्य हाती निराशाच लागते

माणसं ना कधी कोणाची होती, ना कधी कोणाची होतील

हे मात्र मी यातून शिकलोय..

बहुतेक मी माणसं ओळखायला चुकलोय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy