ती सांगत नाही दु:ख तिचे...
ती सांगत नाही दु:ख तिचे...


*माझा बाप गेल्यापासून माय*
*ती सांगत नाही दु:ख तिचे*
*आतल्या आत रडते धुमसत*
*भोग मानत राहते स्वतःचे....!!*✒
*मारते उसवल्या पदराला गाठी*
*हाडाची काडं करते संसारासाठी*
*पै पै जमा करते लेकरांसाठी*
*खंबीरपणे उभी राहते लेकरांपाठी ...!!*✒
*डोईवरचे केस गेलं कामं करून*
*ती सांगत नाही दु:ख तिचे*
*हाकते संसाराचा गाडा एकटीच*
*बोल गिळते दु:ख सोसते अंतरीचे...!!*✒
*उजाडल्या कपाळावरचं गोंदण*
*मला जगण्याची उम्मीद देते*
*द्रारीद्र्यानं झडपलेल्या झोपडीला*
*पाहुनी माझे ह्रदय लय हेलावते....!!*✒
*खचू नको माय तू आता बघ तुझा लेक*
*खूप शिकीन शाळा मोठा साहेब होईन*
*मायच्या चंद्रमोळ्या स्वप्नासाठी माय*
*मी रक्ताचं पाणी करून सुख तुला देईन....!!*