STORYMIRROR

Prasad Kulkarni

Tragedy

4  

Prasad Kulkarni

Tragedy

वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

1 min
227

वृद्धाश्रमात ठाण्याच्या माझी आत्या असते

मधूनमधून जातो मी तिला भेटायला


गेल्यावर मात्र जे भकास चित्र दिसते

पाहिल्यावर नको वाटू लागतं पुन्हा जायला


सणवार वाढदिवसाचे गोडधोड सारे मिळते

डोळे मात्र आतुरले असतात, मुलांना पाहायला


ती दिसणार नाहीत नेहमी, हे जेव्हा समजते

शिकतात मग सारी स्वतःशी, खोटं खोटं हसायला


एकटेपणाची जाणीव जीवाला खूप जाळते

टपटपणाऱ्या आसवांनी उशी लागते भिजायला


नाही कुणी येणार आपले हे जेव्हा वळते

मूळ स्वभावाच्या पाऊलखुणा त्या, लागती दिसायला


विचित्र वागण्या - बोलण्याची अहमहमिका लागते

कळवतील घरी अन् येईल कुणी घरातला


न उपयोग काही न हाती काही लाभते

आनंद माना इथे यामध्ये हे लागते कळायला


काकुळल्या वृद्ध चेहऱ्यावरती आशा एकच उमटते

उरल्या आयुष्यी अपुल्या पाय लागतील का घराला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy