ती
ती
1 min
397
जेव्हा पडते ती आजारी
धाबे घराचे दणाणते
कामे आता अापुल्यावर सारी
कल्पनेने कंबर जडावते
जेव्हा पडते ती आजारी
महती तिची तेव्हा कळते
सदा म्हणतो 'काय काम घरी'
'कर मला' म्हणुनी काम बोलावते
जेव्हा पडते ती आजारी
पहिल्याच दिनी काया शिणावते
करीतसे कशी नित्यनेमे माघारी
कर विचार मनी, मन मज म्हणते
जेव्हा पडते ती आजारी
घरपण घराचे ते उंचावते
स्पर्शास तिच्या अासुसती सारी
उणीव साऱ्या तिची जाणवते
जेव्हा पडते ती आजारी
निराशेने मन मग घोंघावते
कुटुंबप्रमुख आम्ही घरचे जरी
साथीची सदा गरज, तिच्या असते
