Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prasad Kulkarni

Tragedy

3  

Prasad Kulkarni

Tragedy

पर्याय

पर्याय

1 min
208

आधीच शरीर झालेलं विकलांग ,

त्यात आजारांची लागलेली रांग.

जरा हालचाल केली की वाटतात श्रम ,

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.

वय झालं की संपतो उपयोग ,

आयुष्यही किती भोगायचे भोग.

माजच उतरतो सगळा एकदम ,

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.

रिकामपण उठून अंगावर येतं ,

आजूबाजूलाही आता कुणीच नसतं .

कुटुंबातलं होतं अस्तित्वच खतम ,

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.

घरात सगळेच असतात सक्रिय ,

कुणाला हवाय सांगा ,गोळा निष्क्रिय ?

अचानक पहिला जातो शेवटाला क्रम ,

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.

तिथे मात्र एक बरं असतं ,

कुणीच कुणाला नको असतं .

राहायचं होऊन डिफ आणि डंब

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.

आपणही बुकिंग करून ठेवावं ,

वानप्रस्थाश्रमासारखं आपलं निघून जावं.

बाळगायचा कशाला नात्याचा भ्रम ?

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy